Saturday 31 October 2015

बोलकी पुस्तके

अशिक्षित कोण? 
मामुली मॅट्रिक झालेला मुलगा उत्तम सुतारालाही मूर्ख समजतो अशी आजची स्थिती आहे. तो त्याला म्हणतो, ‘माझ्या घरी अमुक काम आहे, तुझी मजुरी काय आहे?’ म्हणजे तो त्याला ‘तुझी’ मजुरी असे विचारतो; ‘तुमची’ मजुरी काय असे विचारीत नाही. एवढा मोठा कुशल कारागीर, जो देशाची सेवा करतो व प्राज्ञ आणि अनुभवी पुरुष आहे, त्याला तो ‘तू’ म्हणतो. एवढ्याच बळावर की त्याला लिहिणे-वाचणे येत नाही.


महमंद पैगंबरांची एक सुंदर गोष्ट आहे. एकदा ते ध्यानसमाधित मग्न होते. त्यांना ईश्वराचे दर्शन पाहिजे होते. ईश्वराने त्यांच्यासाठी एक पत्र लिहून ठेवले. महंमद पैगंबरांना वाचता येत नव्हते. म्हणून ते म्हणाले, ‘मी अशिक्षित माणूस आहे. मला तुझे दर्शन पाहिजे.’ मग देवाने स्वतः येऊन त्यांना दर्शन दिले. त्यानंतर महमंद पैगंबर लोकांना ही कथा सांगून म्हणत की, ‘मी’ जर शिकलेला असतो तर, मला ईश्वराचे दर्शन झाले नसते, नुसते पत्रच मिळाले असते

No comments:

Post a Comment