Monday 30 November 2015

कुमार गीत

रोज चांगली बुद्धी दे..

रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण ज्याला
सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला II धृII 

दूर दूर पलीकडे ढगांच्याही वर
खरच का गं असलं तिथे देवबाप्पाचं घर
तोही चांदण्यांच्या अंगणात येतो का खेळायला  II II

सांग ना गं आई कुणी पाहिलंय त्या देवाला...

त्याला सुद्धा शाळेत कधी जावं लागतं काग
आमच्या एवढं मोठ दफ्तर न्यावं लागतं काग
दरवर्षी पास व्हावं लागतं काग त्याला  II II

सांग ना गं आई कुणी पाहिलंय त्या देवाला...

आमच्या सारखे खेळ कधी तोही खेळतो काग
खेळामध्ये दोस्तांसंगे तोही भांडतो काग
कपडे मळले म्हणून कुणी रागवतं का त्याला IIII

सांग ना गं आई कुणी पाहिलंय त्या देवाला...

त्याला सुद्धा असेल का ग तुझ्यासारखी आई
झोप नाही आली तर गाते का अंगाई
ताई दादा बाबा सुद्धा असतील काग त्याला IIII

सांग ना गं आई कुणी पाहिलंय त्या देवाला...

स्त्रोत – भारत ज्ञान विज्ञान समुदाय

(या गीताची चाल ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ पहा)


No comments:

Post a Comment